Ad will apear here
Next
भक्तीरसाचा अनुभव देणारा ‘नामाचा गजर’
श्रीनिवास जोशी, सावनी शेंडे-साठ्ये व पं. रघुनाथ खंडाळकर यांचे गायन

पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी...’, ‘विठ्ठल विठ्ठल...’च्या जयघोषात भक्तिभावाने वारकरी पंढरीची वाट चालू लागतात. त्याच भक्तीरसाची अनुभूती देणारा अभंग आणि संतरचनांवर आधारित ‘नामाचा गजर’ हा सांगीतिक कार्यक्रम सलग पाचव्या वर्षीही होत आहे. 

कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएलतर्फे आयोजित कार्यक्रम येत्या शुक्रवारी, पाच जुलै २०१९ रोजी कोथरूड येथील एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रसिकांना सभागृहात प्रवेश दिला जाईल. 

दर वर्षी शास्त्रीय संगीताबरोबरच वारीच्या काळात वारकरी संप्रदायातील पारंपरिक संतरचना रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने दर वर्षी वारकरी संप्रदायातील गायक या कार्यक्रमातून संत रचना सादर करतात. यंदाच्या वर्षीदेखील या कार्यक्रमात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांचे अभंग गायन होईल, याबरोबरच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे-साठ्ये या आपली गायनकला सादर करतील. वारकरी संप्रदायातील पं. रघुनाथ खंडाळकर यांचे वारकरी चक्री भजन अनुभविण्याची संधीही रसिक पुणेकर प्रेक्षकांना मिळणार आहे. 

या वेळी कलाकारांना पांडुरंग पवार (तबला), राहुल गोळे (संवादिनी), गंभीर महाराज अवचर (पखावज), तसेच माऊली टाकळकर व अनिल भुजबळ (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चिदानंद कुलकर्णी करणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZYCCC
Similar Posts
रंगला विठ्ठल ‘नामाचा गजर’... पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात सुरांचा आनंद घन रसिकांवर बरसला, अन् विठ्ठल नामाचा गजर सभागृहभर दुमदुमला... निमित्त होते एबीआयएल व कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘नामाचा गजर’ या संतरचना आणि अभंग यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे.
आनंद भाटे यांना वैष्णव पुरस्कार जाहीर पुणे : स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांना कै. ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’ देशभरातील दिग्गज गायक,वादक यांची मांदियाळी जिथे जमते त्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार आतूर असतो. अभिजात शास्त्रीय संगीताचा समृद्ध ठेवा खुला करणारा, एक विलक्षण अनुभूती देणारा हा स्वरसोहळा म्हणजे श्रोत्यांसाठीच नव्हे, तर कलाकारांसाठीदेखील एक पर्वणी असते
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ११ ते १५ डिसेंबरदरम्यान पुणे : ‘आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दर वर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा बुधवार,११ डिसेंबर ते रविवार, १५ डिसेंबरदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language